Saturday 29 December 2018


                               -: Harishchandragad :-


हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर पुणे जिल्यातील सर्वात उंच शिखर आहे.

कोकण कडा
  • नाव - हरिश्चंद्रगड
  • उंची - ४००० फूट
  • प्रकार - गिरीदुर्ग
  • चढाईची श्रेणी - मध्यम
  • ठिकाण - पुणे, जिल्हा - [महाराष्ट्र]
  • जवळचे गाव - पाचनई, खिरेश्वर
  • डोंगररांग - हरिश्चंद्राची रांग
  • सध्याची अवस्था - व्यवस्थित

 गडावर जाण्यासाठीचे मार्ग :-

खिरेश्वर मार्ग :- (चढाईची श्रेणी - मध्यम)             
    हा मार्ग पुण्याहून येणाऱ्या 
पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरू शकतो .
( आम्ही ह्याच मार्गचा वापर करून वर गेलेलो)

 पाचनई मार्ग :- (चढाईची श्रेणी - सोपी)             
    हा मार्ग मुंबईहून येणाऱ्या 
पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरू शकतो .

टोलार खिंड मार्ग :- (चढाईची श्रेणी - अवघड)               
  हा मार्ग थोडासा अवघड आहे इथे 
खाली येताना रास्ता सापडणे अवघड जाते .
(आम्ही खाली येताना या मार्गाचा वापर करून आलो) .

नळीची वाट मार्ग  :- (चढाईची श्रेणी - खूप अवघड) 
हा मार्ग वर जाण्यासाठी खूपअवघड आहे . 
जे नवीन जातायत त्यांनी या मार्गाचा
वापर करू नये .

हरिश्चंद्रगड येथे गुहा -

या गुहांमध्ये सर्व किल्ले पसरले आहेत. यापैकी बरेच तारामटी 
शिखराच्या पायथ्याशी वसलेले आहेत आणि काही निवासस्थान 
आहेत. काही मंदिराच्या जवळ आहेत, तर काही काठाच्या जवळ 
आहेत आणि काही जंगलात आहेत. 
                 किल्ल्याच्या काठाच्या उजव्या बाजूला, (9.1 मीटर) 
खोल नैसर्गिक गुहा आहे. अजूनही इतर अनेक गुंफांचा शोध 
लावला जात नाही.

तारामती शिखर -

तारामती शिखर हे तारामांची म्हणूनही ओळखले जाते. 
या शिखरावरुन जंगलामध्ये तअनेक वन्यप्राणी  दिसतात. 
येथून आपल्याला ननेघाटच्या संपूर्ण श्रेणी आणि मुरबाडच्या 
किल्ल्याची झलक दिसू शकते. या तारामती बिंदूवरून, 
दक्षिणेकडील भीमाशंकरजवळ सिद्धागड 
आणि नप्ता ट्विन शिखर, कुलांग किल्ला उत्तरेकडे कासार 
प्रदेशाजवळील किल्ल्याची झलक दिसू शकते.

इतिहास -

किल्ला फार प्राचीन आहे. येथे प्राचीन अवशेष सापडले आहेत. 
11 व्या शतकात येथे विविध गुहा कदाचित कोरलेले आहेत. 
या गुहेत भगवान विष्णुच्या मूर्ती आहेत.  किल्ल्यावरील विविध 
बांधकाम आणि आसपासच्या क्षेत्रातील लोक विविध संस्कृतींच्या 
अस्तित्वाकडे निर्देश करतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वरच्या 
गुहेत नागेश्वरच्या मंदिराचे (कोहेरेश्वर गावात) शिलालेख, शिव, 
शक्ती  संबंधित असल्यामुळे मध्यकालीन काळाचा किल्ला आहे. 
नंतर किल्ला मुगलच्या ताब्यात होता. 
1747 मध्ये मराठ्यांनी कब्जा केला.

कोकण कडा -

या खडकावर पश्चिम दिशेने कोंकण दिसतात. हे आसपासच्या 
प्रदेश आणि सूर्य एक सुंदर दुश्य  प्रदान करते. या किल्ल्याचे सर्वांत 
मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा.
स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. 
हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे.

कोकणकड्याला पडलेली धोकादायक भेग  -

हरिश्चंद्रगडावरील या प्रसिद्ध कोकणकड्याच्या माथ्यावर मोठी भेग 
पडली असून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची 
तातडीने दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही 
दिवसांत कोसळण्याची शक्यता आहे. 
पर्यटकांना कड्याच्या टोकाचा हा भाग लोंबणारा (पुढे आलेला) 
असल्याची कल्पना असतेच असे नाही. 
हा भाग कोसळल्यास कोकणकड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे.
दरीतून वाहत येणार्‍या वार्‍याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस 
यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता आहे



माझा अनुभव :

23 मार्च 2018 (5:00 pm) :-

                        आम्ही 6 मित्र 3 बाईक वरती पुण्याकडून हरिश्चंद्रगडा कडे 
निघालो . यामधील अंतर 175 km होता . 5 वाजता ठीक आम्ही पुणे सोडले 
आणि निघालो आमच्या वाटेने मग 8 वाजता चहा साठी ब्रेक घेतला तेंव्हा 
कुठे 80 km अंतर पार झाले होते. रात्रीची वेळ आणि समोरून येणाऱ्या 
गाडया आणि त्यांचा प्रकाश खूप त्रासदायक प्रवास चालू होता. रात्रीचे 11 
वाजले मग ठरवलं की आपण जेवण करून घेऊ. एवढ्या रात्री तिथे काही 
मिळणार नाही . एका हॉटेल मध्ये जेवण केलं आणि तिथून निघालो. 
एका फाट्या पासून आत निघालो त्या गावाच्या पायथ्याशी ( खिरेश्वर गाव ) . 
काळोख अंधार आणि आमच्या फक्त 3 गाड्या भीती वाटत होती एवढा
भयानक रोड आणि बाजूला मोठा तलाव . कसे कसे रात्री 12 वाजता गडाच्या 
पायथ्याशी पोहोंचलो. तिथे एका घराबाहेर रात्र घालवली .


24 मार्च (7:00 am) :-     

                       सकाळी सर्वजण तयार झाले , चहा बिस्कीट घेतले आणि 
आम्ही गाड्या तिथेच पार्क करून गड चढण्यास सुरुवात केली. सुरवात अशी 
झाली की असे वाटायला लागले की आपण कधी हा पार करणार . लिंबू शरबत 
घेत घेत कसे तरी वर पर्यंत गेलो. वरून सुर्यादेवता आग सोडत होते आणि ऋतु
उन्हाळा होता, त्यामुळे थोडे जास्तच हाल झाले . पाणी खालून भरून घेतले होते.
( 12 lit) प्रत्यकाकडे 2 बॉटल अस , मग दुपारी 1 वाजता आम्ही वरती ( मंदिराजवळ) 
पोहनचलो . मग तिथे आराम केला आणि 5 वाजता नाश्ता करून कोंकण कड्याकडे 
निघालो . परत कोकणकड्याच्या कडेवर बसून सूर्यास्त पहिला, फोटोशूट केला , 
परत शेकोटी करून तिथे जेवन केले आणि tent मध्ये झोपलो .



25 मार्च (8:00 am) :- 

                                  सकाळी सर्व वरचं आवरून घेतले, ना कोणच्या मोबाइलला 
चार्जिंग ना नेटवर्क, गड उतरण्यास सुरवात केली. आणि प्लान मधे बदल केला ,
गडावरून खाली येण्यासाठी जो रस्ता होता तो सोडून आम्ही दुसऱ्या मार्गाने यायचे 
ठरवले  (चोर दरवाजा ), खाली येताना परत आमचा रस्ता हरवला मग थोडासे 
आम्ही घाबरून गेलो, तिथे विचारायला कोणी माणूसही दिसत नह्वता,
कसे कसे करत खाली पर्यन्त उतरलो  आणि उन्हामध्ये  दुपारी 2 
वाजता खाली पोहनचलो. खाली जिथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या होत्या,
तिथे जेवण केले आणि ऊन कमी होई पर्यन्त आराम केला.
मग आम्ही आराम करून पुण्याच्या दिशेने 4 वाजता वापस निघालो, 
आणि रात्री 9 वाजता पोहनचलो  ..



अशी 3 दिवस 2 रात्रिची छोटी trip .


तुम्ही पण जाऊ शकता तुमच्या फॅमिली,मित्रपरिवार यां सोबत .. 
आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्र ट्रेक करायला हवा ....



एकूण खर्च :- पेट्रोल एका (2 wheeler) ला =  (570₹ : 50 kmpl)


                 :- नाश्ता / चहा  = 150₹


                 :- जेवण (1 lunch 1 dinner ) = 250/-


                 :- रात्री झोपण्यासाठी ( tent on rent ) = 200 ₹



( गडावर कोणत्याही नेटवर्कला range नाही भेटत. JIO  नेटवर्क 
असेल तर सोयीस्कर ठरू शकत.)




जाण्याचा मार्ग :- पुणे - चाकण - राजगुरुनगर - नारायणगाव 
                        - जुन्नर - खिरेश्वर (पायथा)




एकूण अंतर    : -  175 km .



         

ट्रेकचे सोबती :

ट्रेकचे सोबती :

  1. सुमित पवार 
  2. चेतन माने 
  3. मकरंद गाजरे 
  4. सुमेध नरहरे 
  5. शुभम शिंदे 


फोटो गॅलरी










                                          THANK YOU